अन्य

पत्रद्वारा संस्कृतम् – मराठी

पत्रद्वारा संस्कृतम् हा संस्कृतभारती द्वारा चालवण्यात येणारा उपक्रम आहे।
ज्या लोकांना प्रत्यक्ष संस्कृतवर्गात येऊन बसण्यासाठी वेळ किंवा क्षमता नसते, अशा लोकांसाठी घरबसल्या संस्कृत शिकण्याची संधी पत्रद्वारा संस्कृतम् या उपक्रमाद्वारे देण्यात येते।
या परीक्षेला बसण्यासाठी संस्कृतभारती च्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागते।
त्यानन्तर आपल्याला पोष्टाद्वारे पुस्तके पाठवल्या जातात। आणि ६ महिन्यांनी परीक्षा होते व पोष्टानेच घरपोच प्रमाण पत्र मिळते।

या परीक्षेचे सहा सहा महिन्यांचे चार स्तर आहेत

  • प्रवेश
  • परिचय
  • शिक्षा
  • कोविद
पत्रद्वारा संस्कृतम् या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आम्ही ऑनलाईन वर्ग आयोजित केलेले आहेत। त्या वर्गांच्या पाठांचे दुवे –

प्रवेश

  • पत्रद्वारा संस्कृतम् – प्रवेश (मराठी)  पाठ १

  • पत्रद्वारा संस्कृतम् – प्रवेश (मराठी) पाठ २

सर्व संस्कृतप्रेमींना विनंती आहे की पत्रद्वारा संस्कृतम् या उपक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यन्त पोहचवण्याचा प्रचत्न करावा। जेणेकरून जे लोक उद्योगव्यवसायामुळे संस्कृत शिक्षणापासून वंचित राहिले आहेत त्यांना या उपक्रमाचा लाभ मिळू शकेल।

धन्यवाद

Leave a Reply